Friday, 12 March 2021

Thursday, 11 March 2021

जागतिक महिला दिन निमित्त " महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास " या कार्यशाळेचे आयोजन , समाजातील विविध प्रसार माध्यमांनी घेतलेली कार्याची दखल

 राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )  यांच्या संयुक्त विद्यमाने , जागतिक महिला दिन निमित्त  " महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास " या कार्यशाळेचे आयोजन      

 समाजातील विविध प्रसार माध्यमांनी घेतलेली कार्याची दखल  

https://public.app/s/LcuKA    

लिंक  -  पब्लिक अँप 


http://adiwasikrantimarathinews.com/kk-3/   

लिंक  -  आदिवासी क्रांती मराठी न्यु  


https://skillmozari.blogspot.com/2021/03/blog-post.html

लिंक  -  स्किल मोझरी , ब्लॉग , आय टी आय , मोझरी 


Monday, 8 March 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस ) यांच्या संयुक्त विद्यमाने , जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून " महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास " या कार्यशाळेचे आयोजन

    राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )  यांच्या संयुक्त विद्यमाने , जागतिक महिला दिन निमित्त  " महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास " या कार्यशाळेचे आयोजन               

                   जय गुरु  , राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )  यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक ०८ मार्च २०२१ , सोमवार रोजी , दुपारी १२.१५ वा., जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  " महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास " या कार्यशाळेचे आयोजन अमरावती जिल्हा मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे डिजिटल गुगल मीट  ऑनलाईन लिंक : - https://meet.google.com/nxq-rini-wjx  च्या माध्यमातून कारणात आले होते  

                 या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून  सौ. जोत्स्ना प्रकाश शेटे मॅडम , अध्यक्षा , दीपज्योती बहुउद्देशीय महिला विकास संस्था , अमरावती , सौ. वैशाली बेले मॅडम , निदेशिका ,  आय टी आय मोझरी ,  श्री. प्रमोद कोळमकर सर ,शिल्प निदेशक , आय टी आय , मोझरी लाभले होते , आपल्या मार्गदर्शनामध्ये विशेष भर तांत्रिक शिक्षणावर देऊन  देऊन  महिलांनी समृद्धीने वाटचाल करण्याकरिता अधिक जबाबदारीने समाजात वावरले पाहिजे असे मत व्यक्त केले , त्यांनी आपल्या काव्य स्वरूपात गीत गाऊन , मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा , हा पण मोलाचा संदेश दिला. 

                तसेच या कार्यशाळेला श्री. प्रमोद कोळमकर सर , यांनी महिलांनी आपले अधिकार जाऊन घेण्याकरिता  आपली राज्य घटना चा सविस्तर अभ्यास करावा व खऱ्या अर्थाने महिला शिक्षनाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आपल्या जीवनामध्ये मध्ये अंगीकार करावा , असे आपले मत व्यक्त केले. सदर कार्यशाळेला मार्गदर्शन करताना सौ. वैशाली बेले मॅडम यांनी , समाजात महिला विषयी वाईट विचाराचे समूळ नाश करायचं असेल तर प्रत्येक सजक नागरिकांनी तो आपल्या घरामधून आपल्या मुलांवर संस्कार देऊन करावा या साठी ग्रामगीता चा आधार घ्यावा असे परखड मत मांडले. 

               तसेच संस्थेतील वीजतंत्री व्यवसायातील प्रशिक्षणार्थी कु. समिक्षा घाटोड हिने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना राष्टसंत यांच्या  ग्रामगीतेवर अधिक भर देऊन  ग्रामगीता मधील ओळीं चा  प्रभावी वापर करून सर्वाना मंत्रमुद्ध केले व शेवटी श्री. प्रमोद कोळमकर सर यांनी कार्यशाळेचा समारोप मध्ये सदर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी संस्थेचे प्र. प्राचार्य श्री. देशपांडे साहेब व गटनिदेशक श्री मंगेशजी राऊत सर यांचे सहकार्य लाभले त्याकरिता व  कार्यशाळेला लाभलेले मार्गदर्शक व प्रक्षिणार्थी यांचे  आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.   

               सदर कार्यशाळेला संपूर्ण संस्थेतील ४० ते ४५ मुले व मुली उपस्तित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.