आय. टी. आय मोझरी ( गुरुकुंज) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त मौन- श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी येथील संपूर्ण कर्मचारी, येथून बदलून गेलेले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी अशा संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने मागील वर्षी निर्णय घेतले होते. त्यानुसार संस्थेच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या प्रतिकृती स्मारकाचा प्रथम टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्ताने रंगरंगोटी करून हा योग साधण्यात आला. तिथीनुसार सोमवार दिनांक २५.१०.२०२१ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५३ वी पुण्यतिथी होती. त्यानिमीत्ताने संस्थेत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय भावनिक वातावरणात पार पडला. संस्थेचे प्राचार्य श्री. विवेकजी पडोळे साहेब यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आरती केली व श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने केलेली आकर्षक फुले व रांगोळीचा साज हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले होते.
विशेष उपस्थिती मध्ये श्री. कमलाकर विसाळे साहेब , जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी , अमरावती , श्री. नरेंद्र येते साहेब , सहा. सहसंचालक , अमरावती श्री. गजानन चोपडे साहेब, प्राचार्य, अचलपूर तसेच माजी प्राचार्य श्री. डी. जी. देशमुख साहेब हे प्रमुख उपस्थितांमध्ये होते. तसेच श्री. मानकर साहेब, श्री. तिवारी साहेब व निदेशक संघटनेचे माजी सरचिटणीस श्री. भोजराजजी काळे सर व मित्रमंडळी यांची विशेष उपस्थिती होती. त्याप्रमाणेच संस्थेतील सर्व निदेशक वर्ग व संपूर्ण कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनी कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केले. समारोप प्रसंगी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्टीय सेवा योजना पथक , यांच्या माध्यमातून कळविण्यात आले आले .. धन्यवाद
प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल -------
