Friday, 29 April 2022

मराठी गीतासह , बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज

 "माय मराठी"

!!.अमृताचिये पैजा जिंके.!!

सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त  मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे"  महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज... आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गाणे याच हौशी निदेशक कलाकारांचे हक्काचे DIGITAL कलात्मक व्यासपीठ वर व दिलेल्या डिजिटल माध्यम चा वापर करावा ,  https://nscsuren.com🎸 https://nsc-suren.blogspot.com   NSC अँप लिंक-  https://strong-ray-6120.glideapp.io/  crome browser मध्ये ओपन करून अँप mobile इन्स्टॉल करा व घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या https://t.me/joinchat/iNMBTOz-Ve85MjU1 निदेशक सांस्कृतिक चळवळ , आता telegram  अँप वर जॉईन करण्यासाठी लिंक ,  उत्कृष्ट कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात  येईल  , माझा तुमचा सर्वांचा अभिमान... मानसन्मान... जय महाराष्ट्र.जय निसांच...




Thursday, 28 October 2021

आय. टी. आय मोझरी ( गुरुकुंज) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त मौन- श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

आय. टी. आय मोझरी ( गुरुकुंज) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त मौन- श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न .     


                    
   

                             राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी येथील संपूर्ण  कर्मचारी, येथून बदलून गेलेले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी अशा संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकमताने मागील वर्षी निर्णय घेतले होते. त्यानुसार संस्थेच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या प्रतिकृती स्मारकाचा प्रथम टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्ताने रंगरंगोटी करून हा योग साधण्यात आला. तिथीनुसार सोमवार दिनांक २५.१०.२०२१ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५३ वी पुण्यतिथी होती.  त्यानिमीत्ताने  संस्थेत मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय भावनिक वातावरणात पार पडला. संस्थेचे प्राचार्य श्री. विवेकजी पडोळे साहेब यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आरती  केली व  श्रद्धांजली वाहिली. यानिमित्ताने केलेली आकर्षक फुले व रांगोळीचा साज हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले होते.

                            विशेष उपस्थिती मध्ये श्री. कमलाकर विसाळे साहेब , जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी , अमरावती , श्री. नरेंद्र येते साहेब , सहा. सहसंचालक , अमरावती   श्री. गजानन चोपडे साहेब, प्राचार्य, अचलपूर तसेच माजी प्राचार्य श्री. डी. जी. देशमुख साहेब हे प्रमुख उपस्थितांमध्ये होते. तसेच श्री. मानकर साहेब, श्री. तिवारी साहेब व निदेशक संघटनेचे माजी सरचिटणीस श्री. भोजराजजी काळे सर व मित्रमंडळी यांची  विशेष उपस्थिती होती. त्याप्रमाणेच संस्थेतील सर्व निदेशक वर्ग व संपूर्ण कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनी कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य केले. समारोप प्रसंगी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला , असे संस्थेतील कार्यरत  राष्टीय सेवा योजना पथक , यांच्या माध्यमातून कळविण्यात आले आले .. धन्यवाद

प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल -------  

https://adiwasikrantimarathinews.com/d-89/ 

Friday, 30 April 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम जयंती निमित्र्य , राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन.

                         



  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम  जयंती निमित्र्य ,  राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन.  

                       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम  जयंती निमित्र्य ,  राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन , दि. 30 एप्रिल,२०२१ रोजी दुपारी 12:30वा. करण्यात आले होते ,  यासाठी या  व्याख्यानाचा आस्वाद घेण्याकरिता विनंती आयोजक श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी  सर्व  प्रशिक्षणार्थी , रासेयो स्वयंसेवक, सर्व निदेशक व कर्मचारी वर्ग यांना नम्र निवेदन केले होते. सध्या कोरोनाचा काळ लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन GOOGLE MEET च्या स्वरूपात करण्यात आले होते , करीता Join Meeting लिंक  :  meet.google.com/znm-osiv-fsq देण्यात आली होती. 

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती  यांच्या जयंती निमित्र्य राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान आयोजन या विषयावर ,  आभासी व्याख्यानाचे आयोजन  दि. 30 एप्रिल,२०२१ रोजी दुपारी 12:30वा. करण्यात आले होते , या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक मध्ये कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेंन आर भांडे यांनी  कार्यक्रमाची रूपरेषा व मान्यवरांचे शब्ध सुमनांनी स्वागत केले , राष्ट्रसंतांनी आपल्या समग्र साहित्यामधून अतिशय पुरोगामी व परिवर्तनवादी विचार मांडले आहे  , राष्ट्रसंतांचे संपूर्णच विचार  विज्ञानवादी व पुरोगामी विचार असल्याने  सर्वांपर्यंत पोहचणीवे ,  आजची नितांत गरज असून त्यामुळेच समाजात परिवर्तन घडून येवू शकते. 

या वेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. प्रमोदजी कोळमकर , जेष्ट निदेशक आय टी आय मोझरी यांनी सांगितले कि राष्ट्रसंतांच्या साहित्यामधे जागोजागी आपल्याला लोककल्याणकारी विचारांचा भरणा दिसून येतो.बहुजन समाज हा अंधश्रध्दा,कर्मकांड,यज्ञयाग,घातक रुढी परंपरा,अनिष्ट चालीरीती,बुवाबाजी यामधे फसलेला आहे याची महाराजांना जाणीव होती.यातून बहुजनांना बाहेर काढल्याशिवाय त्यांची प्रगती व विकास होणे कठीण आहे हे त्यांना ठाऊक होते.त्यामुळे त्यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आपल्या साहित्याची निर्मिती केली.त्यांना आधुनिक विचारांचा आणि विज्ञानवादी विचार अंगिकारणारा माणूस हवा होता.म्हणून त्यांनी माणूस द्या मज माणूस द्या अशी आर्त हाक घातलेली आहे , असे मार्गदर्शन करताना श्री. प्रमोदजी कोळमकर  सर यांनी आपले मत  विषद केले.

या आभासी व्याख्यान मध्ये  यामध्ये  श्री. सुरेशजी कांडलकर सर , ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त शिल्प निदेशक यांनी अधिक माहिती ग्राम गीता विषयी  सांगीतले  कि ,   राष्ट्रसंतांनी ग्रामगीता नावाचा अनमोल ग्रंथ लिहिला व तो शेतक-यांंना अर्पण केला ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे.या ग्रंथामधे ४१ अध्याय असून ८ पंचके आहेत.हा ग्रंथ आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संजीवनी आहे असे मत अनेक विचारवंतांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.त्यामुळे सरकारने या ग्रंथामधील पुरोगामी व समाजपयोगी विचारांचा उपयोग जर जनकल्याणाच्या कामासाठी केला तर निश्चितच देश महासत्ता बनू शकतो इतकी प्रचंड ताकद या ग्रंथामधे आहे.महाराजांनी खरी समाजसेवा कोणती आहे व कोणत्या विचारातून देशाची प्रगती होवू शकते याचे अतिशय योग्य मार्गदर्शन ग्रामगीतेत केले आहे.खरा संत कोणाला म्हणावे व संतांची जबाबदारी कोणती आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी हिंदी व मराठी या दोन्ही भाषेतून भजने व साहित्याची निर्मिती केली.८००० पेक्षा जास्त भजने त्यांनी हिंदी व मराठी भाषेतून लिहिली.त्यांची भजने अतिशय प्रभावी व लोकजागृती करणारी होती.लोकांवर त्यांच्या भजनाचा त्याकाळी प्रचंड प्रभाव होता आणि तो प्रभाव आजही कायम आहे , असे मत श्री. सुरेशजी कांडलकर सर यांनी व्यक्त केले. 

  तसेच या कार्यक्रमाला या संस्थेचे श्री. गजानन मानकर सर , शिल्प निदेशक यांनी  संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. या आभासी कार्यक्रम मध्ये कु. अंकिता मनोहरे या प्रशिक्षणार्थी  हिने  राष्ट्र संतांच्या महान करायचा गौरव करून अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात जन्मलेल्या या संताचा लोकांवर त्याकाळी प्रचंड प्रभाव होता आणि आजही तो प्रभाव टिकून आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त संत नव्हते,तर एक कुशल संघटक व महान साहित्यीक होते असे आपले मनोगत विषद केले. 

आभासी व्याख्यान सरते शेवटी आयोजक श्री. सुरेन आर भांडे सर यांनी संपूर्ण उपस्थित मार्गदर्शक श्री. प्रमोदजी कोळमकर  सर ,  जेष्ट निदेशक आय टी आय मोझरी , श्री. सुरेशजी कांडलकर सर , ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त शिल्प निदेशक , श्री. गजानन मानकर सर , शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थी व सदर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी संस्थेचे प्र. प्राचार्य श्री. देशपांडे साहेब व गटनिदेशक श्री मंगेशजी राऊत सर यांचे सहकार्य लाभले त्याकरिता व  कार्यशाळेला लाभलेले मार्गदर्शक व प्रक्षिणार्थी यांचे  आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  

सदर कार्यशाळेला संपूर्ण संस्थेतील ४० ते ४५ मुले व मुली उपस्तित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे. 

विविध प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल :-  

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी ता. तिवसा , जिल्हा अमरावती व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित

👉 IBN NEWS 7 खालील लिंक वर क्लिक करा 

👉 IBN NEWS 7



                     

                    









Wednesday, 14 April 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य अभिवादन व आभासी व्याख्यान आयोजन

 

जय गुरु , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्र संस्था ,मोझरी   राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित

भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य vfHkoknu आभासी व्याख्यान आयोजन

 

      सर्व प्रशिक्षणार्थी , रासेयो स्वयंसेवक, सर्व निदेशक कर्मचारी वर्ग यांना नम्र निवेदन करण्यात येते की भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्र्य "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार   योगदान या विषयावर ,  आभासी व्याख्यानाचे आयोजन  दि. १४ एप्रिल,२०२१ रोजी दुपार  01:00 वा. करण्यात आले आहे. यासाठी आपण सादर आमंत्रित असून या व्याख्यानाचा आस्वाद घेण्याकरिता आपली आवर्जून उपस्थिती प्रार्थनीय आहे.

प्रमुख मार्गदर्शक:-

श्री प्रमोदजी कोळमकर सर , प्र संस्था , मोझरी

 

प्रमुख उपस्थिती:- श्री. मंगेश राऊत ,  प्र.  गटनिदेशक

कार्यक्रमाचे अध्यक्ष

श्री. व्ही बी देशपांडे साहेब प्राचार्य , प्र संस्था मोझरी

Join Meeting लिंक  :

meet.google.com/eje-bcbt-xkf

कार्यक्रमाचे आयोजक

सुरेन आर भांडे रासेयो, कार्यक्रम अधिकारी , कार्यक्रमाची  लिंक -  meet.google.com/eje-bcbt-xkf

 

 

 

 

 

 

 

 

राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एसयांच्या संयुक्त विद्यमाने , भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य vfHkoknu व आभासी व्याख्यान आयोजन

राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )  यांच्या संयुक्त विद्यमाने , भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य अभिवादन   डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार योगदान आभासी व्याख्यानाचे आयोजन

जय गुरु  , राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )  यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 14 ,fizy २०२१ , रोजी , दुपारी 01.00 वा. की भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्र्य "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार   योगदान या विषयावर ,  आभासी व्याख्यानाचे आयोजन अमरावती जिल्हा मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे डिजिटल गुगल मीट  ऑनलाईन लिंक -  meet.google.com/eje-bcbt-xkf च्या माध्यमातून कारणात आले होते 

                 या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून  श्री. प्रमोद कोळमकर सर ,शिल्प निदेशक , आय टी आय , मोझरी लाभले होते , आपल्या संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे यांनी प्रस्तावित मध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला अभिवादन वंदन करून आज संपूर्ण देशात कोरोना या आजाराचा उद्रेक सुरू आहे.या आजाराच्या सावटात आपल्याला भारतरत्न डॉ-बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करायची आहे- या वेळी डॉ-बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही अतिशय साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे ]कारणही तसेच आहे की, आपण सध्या कोरोना या महाभयंकर आजाराचा सामना करत आहोत , असे सांगितले

   दरवर्षी आपण पाहत आलेलो आहोत की , डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही एखाद्या उत्सवाप्रमाणे आपल्या देशातच नाही ] तर संपूर्ण जगात साजरी केली जाते , परंतु परिस्थीची विचार करून आभासी कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे , या विषयी माहिती दिली

                तसेच या कार्यशाळेला श्री. प्रमोद कोळमकर सर , प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्तित होते , आपल्या मागर्दर्शनमध्ये त्यांनी या महामानवाच्या विचारावर प्रकाश टाकत  महान व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देशच असा असतो की,या महान व्यक्तीने समाजासाठी जे कार्य केले, जी मेहनत घेतली, जो त्याग केले, जे चांगले विचार समाजाला दिले या सर्व गोष्टींना उजाळा देणे त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच असतो असे मत व्यक्त केले , उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हाच की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, यांचे विचार हे नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे,त्यांच्या विचारांचा, त्यांच्या  कार्याचा आदर्श हा विद्यार्थ्यांनी घ्यावा त्या आधारे स्वतःचा आपल्या देशाचा विकास घडवून आणावा.वरील प्रमाणे असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला, त्यांच्या विचारांना सर्वच स्तरातून या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे आपले विचार मांडले.   

या आभासी कार्यक्रमात संस्थेच्या प्रशि. कु. अपेक्ष मनोहरे कु. अंकिता खडसे यांनी पण महामानवाचे विचार सध्याच्या युगात कसे प्रभावी ठरतील , या विषयावर आपले विचार प्रगत केले , प्रत्येकानी संविधानाचा  विचार अंगीकृत केला पाहिजे असे आवर्जून सांगितले , कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शनामध्ये श्री. सुरेन आर भांडे , कार्यक्रम अधिकारी , यांनी संस्थेचे गट निदेशक श्री. मंगेश  राऊत सर श्री. व्ही बी देशपांडे साहेब यांचे आभार उपस्थित प्रशी. , मार्गदर्शक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. 

               सदर अभिवादन कार्यशाळा कार्यक्रमाला संपूर्ण संस्थेतील ४० ते ४५ मुले मुली उपस्तित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.